Sharad Pawar NCP Protest In Pune | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्यात आंदोलन; पुतळ्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची काढली नियत

Sharad Pawar NCP Protest In Pune

सिंधुदुर्ग : Sharad Pawar NCP Protest In Pune | मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Malvan Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. त्यावेळी मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. जयदीप आपटे (Jaydeep Apte) हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील (Chetan Patil) हे सल्लागार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच नित्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेधही करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, १९६१ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं उद्घाटन केलं होतं. तो पुतळा गेल्या ६४ वर्षे सुस्थितीत असून त्याच्या चौथाऱ्याची वीट देखील अद्याप हललेली नाही.

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आठ महिन्यापूर्वी घाई गडबडीत जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारला तो काल कोसळला. पंतप्रधानांची आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियत साफ नाही, असा घाणाघात प्रशांत जगताप यांनी केला.

ते पुढे म्हणाले, पुण्यात, महाराष्ट्रात आणि जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची एकमेव आणि पहिली घटना आहे. कारण उद्घाटन करणारा आणि उद्घाटन करण्याची घाई करणारा यांची नियत आणि नीतिमत्ता साफ नव्हती. त्यामुळे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पुतळा घाई गडबडीत उभारण्यात आला होता.राज्यामध्ये तिघाडी सरकार असल्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढवली आहे.

या दुर्घटनेबाबत बोलताना राज्यातील मंत्री दीपक केसरकर यांनी हा अपघात असून पुढे काहीतरी चांगलं होणार
असेल म्हणून हा अपघात घडला असेल, असं वक्तव्य केलं आहे.
अशा प्रकारचा अपघात होणं हे जर या मंत्र्यांना चांगलं वाटत असेल, तर या सरकारची नीतिमत्ता काय आहे,
हे यातून समोर येते. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा कोसळला आहे,
त्याचा धडा या राज्य सरकारला शिकवेल, असं जगताप यांनी सांगितले. (Sharad Pawar NCP Protest In Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान