Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Sharad Pawar

मुंबई : Sharad Pawar Z+ Security Cover | शरद पवारांच्या झेड प्लस सुरक्षेबाबत दिल्लीमध्ये शुक्रवार (दि.३०) रिव्ह्यू मीटिंग पार पडणार आहे. दरम्यान शरद पवार दिल्लीकडे रवाना झाले आहेत. गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत.

शरद पवारांनी अद्याप केंद्रानी दिलेली सुरक्षा घेतलेली नाही, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी देखील शरद पवारांना महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. केंद्राच्या सुरक्षेवरून शरद पवारांनी कदाचित केंद्राला अचूक माहिती घ्यायची असेल असे संशय निर्माण करणारे वक्तव्य केले होते.

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता उद्या होणारी बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. गृह खात्याकडून अमित शहा, मोहन भागवत आणि शरद पवार यांना विशेष सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. नुकतीच मोहन भागवत यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sharad Pawar)

केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले, “काल माझ्याकडे केंद्रातील गृहखात्याचे एक अधिकारी आले. कदाचित निवडणुका आहेत.
निवडणुकांसाठी मी सगळीकडे फिरणार,
त्यामुळे निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था असू शकते, बाकी मला काही माहिती नाही.”

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान