Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी ‘वर्षा’वर खलबतं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Malvan Shivaji Maharaj Statue

मुंबई : Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed | मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. त्यावेळी मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीत पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधून आणि यासंपूर्ण दुर्दैवी घटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ही समिती संपूर्ण घटनेची जबाबदारी निश्चित करेल.

कोसळलेला पुतळा पुन्हा नव्याने उभारण्यासाठीही एक समिती नेमण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि चांगला पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती नेमणार असल्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

छत्रपतींचा पुतळा पुन्हा नव्याने भव्य स्वरुपात उभारणं यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसंच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि
पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक,
अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर,
अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला,
व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ,
शशिकांत वडके उपस्थित होते. (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना