Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी होणार कचरावेचकांचे महापालिका भवन समोर आंदोलन

Pune PMC

पुणे – Pune PMC News | पुणे शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कणा असलेल्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांची उपजीविका सुरक्षित करण्याऐवजी खाजगी ठेकेदारांना नवीन काम वाटप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav) यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी महापालिका भवनसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

पुण्यातील घराघरातील कचरा हाताळून आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणारे सुमारे चार हजार कचरा वेचक दहा लाख घरांतून कचरा गोळा करत आहेत. प्रामुख्याने हे काम कष्टकर्‍यांनी स्थापन केलेल्या स्वच्छ संस्थेकडे गेली दहा वर्षांहून अधिक काळ आहे. दरम्यान, या संस्थेसोबत नव्याने करार करताना महापालिकेच्या घनकचरा विभागाने जाचक अटी घातल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने एखाद्या कष्टकर्‍याकडून चूक झाल्यास त्याला दंड केला जाणार असून त्या प्रभागातील सर्वच कष्टकर्‍यांचे काम थांबविणार यासारख्या अटींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याला संस्थेचा विरोध असल्याने अद्याप करार झालेला नाही. विशेष असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच शहरातील घरोघरी जावून कचरा गोळा करण्याचे काम स्वच्छ संस्थेकडेच देण्याचा निर्णय झाला आहे. यानंतरही घनकचरा विभागाकडून सातत्याने स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न होत आहेत.

यामध्ये ऐन पावसाळ्यातही करारानुसार या कष्टकर्‍यांना रेनकोट, चपला, हँडग्लव्हज न देणे, ढकलगाड्या व
बकेट वेळेत उपलब्ध करून न देणे व आता करारात जाचक अटी घालणे याचा समावेश आहे.
या विरोधात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता महापालिका भवनसमोर डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचक आंदोलन करणार आहेत,
अशी माहिती स्वच्छ संस्थेच्यावतीने देण्यात आली. (Pune PMC News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना