Pune Crime News | औषध विक्रेत्यांना नोकराने घातला 29 लाखांचा गंडा ! औषध विक्रेत्यांकडून वसुली करुन केले पलायन

Fraud

पुणे : Pune Crime News | होलसेल औषध विक्रेत्यांंकडून माल घेऊन तो किरकोळ विक्रेत्यांना देऊन पैसे वसुल करण्याचे काम करणार्‍या नोकराने विक्रेत्यांना २९ लाखांना गंडा घालून पलायन केल्याचे समोर आले आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत होलसेल औषध विक्रेते सागर कांतीलाल लुंकड (वय३७, रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महावीर भारोशीलाल शर्मा Mahavir Bharoshilal Sharma (रा. वडाची वाडी, उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सदाशिव पेठेत होलसेल औषध विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी मार्केटमध्ये जाऊन ऑर्डर आणण्यासाठी महावीर शर्मा याला ७ वर्षांपासून नेमले होते. ऑर्डर आणणे, माल पुरविणे व बिले पेमेंट जमा करणे असे काम तो करत असे. मे ते जुलै दरम्यान त्याने कोंढवा, उंड्री परिसरातील विक्रेत्यांकडून ऑर्डर आणली व त्याचा मालही पुरविला. पण, बिले जमा केली नाही. त्याबाबत त्याला विचारल्यावर त्याने महिना अखेरीला बिले, पेमेंट आणून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तो दुकानात न आल्याने त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो बंद आढळून आला. त्यांना संशय आल्याने त्यांनी किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली. तेव्हा त्याने उंड्री, कोंढवा येथील १४ विक्रेत्यांकडून ११ लाख ८० हजार ६६६ रुपये घेतले. पण, ते फिर्यादी यांच्याकडे जमा केले नाही. त्यांनी घरी जाऊन पाहिले तर घराला कुलूप होते.

फिर्यादी यांचे सासरे पंकज सुमतीलाल शहा (वय ६६, रा. सुजय गार्डन, मुकुंदनगर)
यांचीही सदाशिव पेठेत होलसेल औषध विक्रीचे दुकान आहे.
त्यांनाही महावीर शर्मा याने अशाच प्रकारे १७ लाख २४ हजार २०५ रुपये असे एकूण २९ लाख ४ हजार ८७१ रुपयांची
फसवणूक करुन तो पळून गेला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश फडताडे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना