Maharashtra Assembly Election 2024 | ‘लोकसभेला आमचेच पैसे घेऊन काँग्रेसचे काम केले, भाजपचा उमेदवार पाडला’, भाजप- राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर; अजित पवारांचे टेन्शन वाढले
अहमदपूर : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान महायुतीतील (Mahayuti) वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. महायुतीत अजित पवारांचा (Ajit Pawar) समावेश केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही (Rashtriya Swayamsevak Sangh – RSS) भाजपाचे कान टोचण्यात आले होते. त्यानंतर आता भाजपकडून (BJP) अजित पवारांना लक्ष्य केले जात आहे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी असल्याचे हाके यांनी म्हंटलेले आहे.
सध्या भाजपची राज्यात जनसंवाद यात्रा (Jan Samvad Yatra) सुरू आहे. हाके या यात्रेच्या निमित्ताने अहमदपूर विधानसभा मतदार संघात (Ahmadpur Assembly Constituency) आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिका केली. त्यांच्या आक्रमक वक्तव्याने महायुतीत सर्व काही आलबेल नाही अशीच स्थिती दिसत आहे.
गणेश हाके म्हणाले, अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंघाशी संघ म्हणतात असा संघ आमच्यासोबत घडवला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने भाजपचे काम केले नाही. उलट आमचेच पैसे घेऊन काँग्रेसचे काम केले असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपच्या उमेदवाराला पाडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले असेही ते म्हणाले.
सध्या अजित पवार गटाचेच आमदार अहमदपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का ? असा प्रश्न हाके यांनी केला आहे.
याअगोदर शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)
यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना त्यांच्या बाजूला जरी बसलो असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते,
असे वक्तव्य करत वातावरण तापवलं होते. तर सावंत यांची हकालपट्टी करा नाही तर आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडतो,
अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली होती.
दरम्यान शिवसेना असो की भाजप असो दोन्ही पक्षांच्या रडारवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
त्यामुळे अजित पवारांचेही टेन्शन वाढले आहे.
अशा स्थितीत विधानसभेला दगा फटका होणार का याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद