LPG Price Hike | गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू , जाणून घ्या

gas

मुंबई : LPG Price Hike | गॅस सिलिंडरचे नवीन दर (दि.१) आजपासून लागू होणार आहेत. या दरानुसार, आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३९ रूपयांनी वाढली आहेत. त्यामुळे देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला असून याचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे.

नवीन दरानुसार, आता १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईत आजपासून १ हजार ६४४ रुपयांना मिळणार आहे.

यापूर्वी हा सिलिंडर मुंबईत १ हजार ६०५ रुपयांना मिळत होता. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

याआधी ऑगस्टमध्ये एलपीजी गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यावेळी कंपन्यांनी ८.५० रुपयांनी वाढ केली होती, मात्र यावेळी त्यांनी थेट ३९ रुपयांनी वाढ केली आहे. याआधी जुलैमध्ये कंपन्यांनी १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी केली होती.

कोलकात्यात या सिलिंडरची किंमत १६६४.५० रुपयांवरून १८०२.५० रुपये झाली आहे.
तर चेन्नईमध्ये हे सिलिंडर आता १८५५ रुपयांना मिळणार आहे.
यापूर्वी चेन्नईमध्ये १९ किलोचा सिलेंडर १८१७ रुपयांना विकला जात होता. (LPG Price Hike)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद