Maharashtra Weather Updates | मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता; IMD ने दिली माहिती
मुंबई : Maharashtra Weather Updates | पुढील दोन आठवड्यांत लागोपाठ कमी दाबाच्या क्षेत्रांची शक्यता असल्याने मान्सूनचा परतीचा प्रवास काहीसा उशिरा सुरू होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये राज्यासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अशी शक्यता (आयएमडी) भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी सप्टेंबर महिन्याच्या हवामानाचा अंदाज ऑनलाइन पत्रकार परिषदेत जाहीर केला. (Monsoon 2024)
डॉ. महापात्रा म्हणाले, ” तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ईशान्येकडील राज्ये आणि लडाखचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त (दीर्घकालीन सरासरीच्या १०९ टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात पुढील तीन आठवड्यांमध्ये लागोपाठ कमी दाबाची क्षेत्रे तयार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रभावामुळे या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, मान्सूनचा परतीचा प्रवासही काहीसा लांबू शकतो. “
ते पुढे म्हणाले, ” ‘हवामानशास्त्रीय मॉडेलनुसार प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती सध्या कायम असून, ऑक्टोबरमध्ये ला निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशात यंदाच्या संपूर्ण मान्सून हंगामावर ला निनाचा प्रभाव नसल्याचे स्पष्ट होत आहे. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोलही सप्टेंबरमध्ये न्यूट्रल स्थितीत राहण्याची शक्यता आहे”, असेही डॉ. महापात्रा यांनी सांगितले. (Maharashtra Weather Updates)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद