Tanaji Sawant News | ‘मंत्री तानाजी सावंतांची पक्षातून हकालपट्टी करावी’, शिंदे गटातील नेत्याची आक्रमक मागणी; म्हणाले – “युतीत खोडा घालण्याचं काम…”
सोलापूर : Tanaji Sawant News | आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत (Ajit Pawar NCP) केलेल्या वक्तव्याने सावंत अडचणीत आले आहेत. तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. तानाजी सावंत यांनी पक्षाला स्वतःच्या घरचा पक्ष समजणे बंद करावे, अशा शब्दात जिल्हाप्रमुख काळजे यांनी सुनावलं आहे.
माध्यमांशी बोलताना मनीष काळजे म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी उठाव केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या योजनांमुळे जनता खुश आहे. असं असताना पक्षात राहून तानाजी सावंत धोका देत आहेत. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि पक्षाच्या विरोधात अनेकवेळा वक्तव्य केली आहेत.
त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजी सावंत यांना समजही दिली आहे. तानाजी सावंत सुधारतील म्हणून आम्ही शिवसैनिक गप्प होतो. पण, वारंवार युतीत खोडा घालण्याचं काम ते करत आहेत,” अशी टीका जिल्हाप्रमुख काळजे यांनी केली.
“तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सांवत हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटायला जातात. तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून भेटायला गेल्याचं अनिल सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्यात राहून तानाजी सावंत असे करत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा राजीनामा घेत पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी.
तानाजी सावंत यांच्या बंधूनं भाजप (BJP) ऐवजी ‘तुतारी’चा (Tutari) प्रचार करण्यास सांगितलं होतं.
यावरून लक्षात येते की हे आपल्यात राहून आपल्याशी गद्दारी करत आहेत,”
असा हल्लाबोल जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी तानाजी सावंत यांच्यावर केला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘ मी मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाही’, असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं.
अशा व्यक्तीनं पक्षाला स्वतःच्या घराचा पक्ष समजणे बंद करावे. पक्षाला अल्टिमेटम तर देऊच नये.
मुख्यमंत्री शिंदेंना अल्टिमेटम देणाऱ्यांचे काय हाल झालेत, हे पाहिलं आहे. असा इशारा काळजे यांनी दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद