Sharad Pawar On Mhayuti Govt | ‘मुख्यमंत्र्यांचं ते विधान धक्कादायक’, महायुती सरकारवर शरद पवारांचे टीकास्त्र; म्हणाले – “मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना…”

sharad pawar eknath shinde

मुंबई : Sharad Pawar On Mhayuti Govt | राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed) दुर्घटनेवरून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आहे (MVA Jode Maro Andolan). या आंदोलनामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महायुतीवर हल्लाबोल केला.

शरद पवार म्हणाले, ” मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. सध्याच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला अशा प्रकारचे धक्कादायक विधान केले.

आज आपण याठिकाणी गेट वे ऑफ इंडियाच्या (Gateway Of India Mumbai) ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या ५० वर्षांपासून लोकांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये असे अनेक पुतळे आहेत. पण मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना होत आहे.” (Sharad Pawar On Eknath Shinde)

ते पुढे म्हणाले, ” राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्ट्राचार झाला हा जनमाणसांमध्ये समज निर्माण झाला आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. तसेच संपूर्ण शिवप्रेमींचाही अपमान आहे.
त्यामुळे हा अपमान करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं “,
असं शरद पवार यांनी सांगितलं. (Sharad Pawar On Mhayuti Govt)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed