Maharashtra Assembly Election 2024 | ‘भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजपा म्हटलं की राष्ट्रवादी वाल्यांचं डोकं उठत होतं…’
लातूर : Maharashtra Assembly Election 2024 | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar NCP) यांना सातत्याने मित्रपक्षांकडूनच लक्ष्य केले जात असल्याने महायुती (Mahayuti) टिकणार का? अशी चर्चा सुरु झालेली आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे एकही मत राष्ट्रवादीला पडणार नाही असा निर्धार लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.
त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादीमधील दरी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अहमदपूरला आली होती. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील वाद उफाळून आल्याचं समोर आले आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे (Ahmadpur Assembly Constituency) विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil MLA) हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, निधी वाटपात कायमच भाजपला डावलले गेल्यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake BJP) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख (Dilip Deshmukh BJP) यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली.
दिलीप देशमुख म्हणाले, “अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारासाठी काम केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही मत भाजपाला पडलं नाही.
यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा लोकसभेत पराभव झाला.
अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्यात आला आहे.
मात्र निधी वाटपात भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं. भाजपा म्हटलं की राष्ट्रवादी वाल्यांचं डोकं उठत होतं.
आता विधानसभेची निवडणूक आहे. भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना पडणार नाही,
आम्ही पडू देणार नाही”, अशी भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी घेतली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद