Sharad Pawar On PM Narendra Modi | शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का ? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल, म्हणाले – ” चुकीचं करता अन् अंगाशी आलं की …”
मुंबई : Sharad Pawar On PM Narendra Modi | मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed) निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सरकारला (Mahayuti Govt) जोडो मारो आंदोलन पुकारण्यात आलं होतं ( Jode Maro Andolan). यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार म्हणाले, ” पुतळा कोसळला आणि सांगितलं जातं पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते. त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. विषय काय? लोकांची अस्वस्था काय? आता विषय काय आहे आणि हे बोलत काय आहेत.
आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते? ज्यांनी रयतेच राज्य आणलं त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं. याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता. अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करता “,अशी टीका शरद पवार यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ” यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. लोकांचं जीवन बदलण्यासाठी अखंड ते प्रयत्न करत होते. ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी कराडमध्ये गेले. ते आईला भेटायला गेले. त्यावेळी त्यांच्या आईला कळलं नाही की आपला मुलगा मुख्यमंत्री झाला. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आपला मुलगा मामलेदार झाला की तहसीलदार झाला? त्यांना माहिती नव्हतं मुलगा मुख्यमंत्री झाला ते.
विधानसभेत विरोधी पक्षनेते एसएम जोशी होते. त्यावेळी त्यांनी सभागृहात काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी त्यांना एक तरूण मंत्री उत्तर देत होता. त्याने तीन वेळा उत्तर दिलं परंतु तरि देखील जोशी यांनी काही उपप्रश्न विचारले त्यावेळी सदर मंत्री म्हणाला त्यांच्या डोक्यात घुसत नाही त्याला मी काय करू? त्यावेळी पटकन यशवंतराव चव्हाण उभे राहिले आणि त्यांनी सभागृहाची माफी मागितली.
शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांचे राज्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी महत्वाची होती.
भाक्रा नांगल धरण बांधण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता.
शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांनी सतत आधुनिकतेची कास धरली होती”,
असेही शरद पवार यांनी म्हंटले. (Sharad Pawar On PM Narendra Modi)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद