Sharad Pawar On PM Narendra Modi | “बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसतंय”, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
मुंबई : Sharad Pawar On PM Narendra Modi | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जागावाटपाबाबत मित्रपक्षांमध्ये चर्चा करीत आहे. लोकसभा निवडणुकीत जागावाटप उशिरा झाल्याने महायुतीला फटका बसला अशी मांडणी केली जात आहे.
लोकसभेच्या प्रचाराला अनेक मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहूनही महायुतीला चांगला आकडा गाठता आला नाही. दरम्यान निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केल्याने काही मतदारसंघात मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला नाकारल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत चिमटे काढले आहेत. ” हे राज्यकर्ते तुमच्या हिताचे नाहीत. नरेंद्र मोदी सांगतात की शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत.
त्यांनी असंही म्हटलं की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात आलो. आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटतेय. आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसतंय “, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले, ” मला आठवतंय की ज्यावेळी शेती व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली. मी शपथ घेतली आणि घरी आलो अधिकाऱ्यांनी पहिली फाईल माझ्यासमोर आणली. देशात अन्न धान्याचा साठा कमी झाल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो.
जगाचा पोशिंदा शेतकरी आणि आपल्या देशात दुसऱ्या देशातून अन्नधान्य आणावं लागलं, पण त्यानंतर भारत जास्त गहू पिकवणारा देश झाला. ज्याच्या हातात सत्ता आहे, आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लिमांची संख्या दुर्लक्षित करण्यासाठी नाही “, असे स्पष्ट करत पवारांनी मुस्लिमांबाबत चिंताही व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, ” सकाळी आम्ही मालवण येथील घटनेचा निषेध केला, अनेकजण उपस्थित होते.
अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. १९६० साली यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याकडे पुतळा बसवला त्याला अजूनही काही झालेलं नाही,
पण यांचा पुतळा सहा महिन्यात पडला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलं कोण तर मोदी.
त्यांचा हात जिथं लागतोय तिथं काहीतरी उलट सुलट होतंय.
पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकर यांची माफी मागण्यात आली नाही.
आता विषय काय आहे आणि हे बोलतं आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते?
ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं “,
असंही शरद पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar On PM Narendra Modi)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक