Vanraj Andekar Murder | सख्या बहिणींच बनल्या वैरी! वनराज आंदेकरच्या बहिणींना अटक, संपत्तीच्या वादातून दिली होती सुपारी

पुणे : Vanraj Andekar Murder | पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार (Koyta Attack) करुन हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट आली असून या प्रकरणात आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. या प्रकरणाने पुण्यात मोठी खळबळ माजली आहे.
https://www.instagram.com/p/C_aHrfjpthT
पुण्यातील नानापेठ येथील डोके तालीम (Doke Talim Nana Peth Pune) परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आंदेकर यांच्या हत्येची घटना घडली होती. दरम्यान हत्या झाल्यानंतर आंदेकर यांच्या नातेवाईकांवर खुनाचा संशय व्यक्त होत होता. आता आंदेकरांच्या वडिलांनी त्यांच्याच मुलींविरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही अटक कारवाई सुरू केली आहे.
https://www.instagram.com/p/C_ZqLsSvWiZ
दरम्यान रविवारी झालेल्या या हत्येच्या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये सुमारे १२ हल्लेखोर आंदेकर यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. हे हल्लेखोर ५-६ दुचाकींवर येत एकाच वेळी आंदेकर यांच्यावर हल्ला करत आहेत.
https://www.instagram.com/p/C_YkEARJkxe
यावेळी वनराज आंदेकरांनी जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याच प्रयत्न केला तेव्हा एकाने त्यांच्या कानाजवळ गोळी झाडली. पुढे आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला.
https://www.instagram.com/p/C_YaceiPW64
वनराज आंदेकर यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणी आणि मेहुण्यांनी प्लॅन केला होता.
संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे,
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात संपत्तीच्या कारणावरुन वाद सुरु होते.
https://www.instagram.com/p/C_aENMlpK8h
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक