Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! पुढील 10 दिवसात होणार घोषणा; जागावाटपात १३ लहान पक्षांना स्थान
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी रणनीती ठरवत मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. लोकसभेला जागावाटप लवकर न झाल्याने महायुतीला फटका बसला होता. तो टाळण्यासाठी महायुतीने विधानसभेचे जागावाटप लवकर मार्गी लावण्याचे ठरवले आहे. १० सप्टेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण होणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. (Mahayuti Seat Sharing Formula)
नागपूरमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवारांची (Ajit Pawar) उपस्थिती होती. या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिली. जागावाटप १० दिवसांत जाहीर करु. महायुतीमधील प्रमुख नेते पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती देतील. जागावाटपात १३ लहान पक्षांना स्थान देण्यात येईल, अशी माहिती बावनकुळेंनी दिली.
महायुतीने जवळपास २०० जागांचा प्रश्न सोडवलेला आहे. सध्या ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाला जागा सोडली जाईल. विद्यमान आमदाराविरोधात वातावरण असल्यास त्याच्या जागी त्याच पक्षाच्या अन्य नेत्याला उमेदवारी मिळू शकते.
भाजपला १५० जागा सुटण्याची शक्यता आहे.
तर शिंदेसेना ७० आणि अजित पवार गट ६० जागा लढवण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर महायुतीमधील दोन पक्ष आमनेसामने होते,
त्या जागांचा प्रश्न निकाली निघायचा आहे. तो पुढील १० दिवसांत सोडवण्यात येणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक