Ajit Pawar On Mahavikas Aghadi | “अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या”, अजित पवारांचा विरोधकांवर घणाघात

Ajit Pawar

बारामती : Ajit Pawar On Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी शरद पवार गटाची जनसन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) बारामतीत आली (Baramati News) असता अजित पवारांनी महाविकास आघाडीवर तुफान फटकेबाजी केली. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed)

राज्यातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात (Mahayuti Govt) ‘जोडे मारो आंदोलना’ची (Jodo Maro Andolan) हाक दिली होती. त्यानुसार काल (दि.१) आंदोलन पार पडले. यावरून अजित पवारांनी मविआच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

मालवण तालुक्यात काही महिन्यांपुर्वी बसविलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेल्या ठिकाणी नुकसान झालं. दुर्दैवी घटना घडली. घडायला नको होते ते घडलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत. तिथ महाराजांच्या नावाला साजेसा स्मारक उभारणार आहे. मी झालेल्या घटनेबद्ल महाराष्ट्रातल्या १३ कोटी जनतेची माफी मागितली.

या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांचा शोध घेवुन त्यावर शासन कारवाई करेल. मात्र, याप्रकरणी मुख्यमंत्री आणि आम्हा दोघा उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले, ” हा कसला रडीचा डाव, याबाबत राजकारण करू नका. महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा असे कोणत्या सरकारला वाटेल, असं कोणालाच वाटणार नाही. त्यात वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आणलं जात आहे. या घटना महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीत. सगळ्या समाजाने गुण्यागोविंदाने नांदायचे, जातीय सलोखा ठेवायचा आहे.

कालच्या लोकसभेच्या निमित्ताने देखील काही समाजातील लोक बाजुला गेले.
घटना, संविधान, आरक्षण बदलणार असल्याचे सांगितले गेले.
त्यामुळे तो समाज नाराज झाला, सगळ्या जातीधर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही राष्ट्रवादीची भुमिका आहे.
या भुमिका घेवूनच आम्ही पुढे चाललो आहोत, याबाबत खात्री बाळगा, असे अजित पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, काहीजण म्हणतात, बारामतीत आता वेगळंच वाटतंय, पूर्वी एवढे ‘पवार’ घरी येत नव्हते.
आता सगळेच ‘पवार’ विचारपुस करायला लागलेत. गेल्या २५ ते ३० वर्षात कोणी आले नव्हते.
काय रे बाबा कसं आहे. तुझं नीट आहे ना, जे पवार केवळ मत मागत होते.
ते घरोघरी दारोदारी फिरायला लागले. सगळेच पवार हे पण आणि ते पण सगळेच पवार फिरायला लागलेत.

हरकतं नाही, तो तुमचा मान आहे. तुम्ही मतदार राजा आहांत. तुम्ही ठरवायंच आहे,
काय करायचं, तो तुमचा अधिकार आहे. त्याच्या खोलात मी जाणार नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed