Ajit Pawar On Supriya Sule | सकाळी उठण्यावरून अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर म्हणाले – ” कुणी बोललं म्हणून अंगाला भोकं पडत नाहीत…”

Supriya Sule-Ajit Pawar

बारामती : Ajit Pawar On Supriya Sule | आपल्या जनसन्मान यात्रेनिमित्त (Jan Sanman Yatra) ते बारामतीमधील लाडक्या बहि‍णींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या बहिण आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य त्यांनी माध्यमांमध्ये केले होते. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. (Ladki Bahin Yojana)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज काही लोकांचा एक डायलॉग ‘मी सकाळी लवकर उठतो’ माझ्यामुळे बंद झाला. कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. सकाळी लवकर दुधवाला पण उठतो?, तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लम आहे कारण तिला तुमच्यासाठी चहा करायला लागतो, अशी टीका पुरंदर येथे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली.

बारामतीमध्ये लाडक्या बहि‍णींशी संवाद साधता अजित पवारांनी नाव घेता सुप्रिया सुळेंना टोला लगावला. काहीजण म्हणतात दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण आम्ही कुठं म्हणलो की दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, बाधकामातलं मला चांगलं कळतं, मी इंजिनिअर नसलो तरी इंजिनिअरला जेवढं जमणार नाही, तेवढं मला जमतं. त्यामुळे, मी सकाळी सकाळी काही काम पाहण्यासाठी लवकर जात असतो, असे म्हणत राजकोट येथील पुतळा पाहणीसाठी मी सकाळी गेलो होतो. राजकीय टीका टिप्पणी टाळून आपण केवळ विकासावरच बोलायला पाहिजे.

काहीजण बोलतात त्यांना बोलू द्या, बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का? काहीजण म्हणतात सकाळी कोण लवकर उठा म्हणतं, पण आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणलाय. म्हणतात की दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण कुठं म्हटलं दुधवाला दुपारी उठतो, अशा टीका टिपण्णीला महत्त्व देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

पोलिसांचा आदरयुक्त दबदबा बारामतीत असला पाहिजे, कुणी टुकारपणा केला तर पोरांना सांगा दादांनी पोलिसांनी टाईट केलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल तर सोडणार नाही, आम्ही खऱ्याच्या पाठीशी राहणार.
बदलापूर आणि पश्चिम बंगालमध्ये जे झालं ते होता कामा नये, नराधमांना फाशी दिली पाहिजे.
त्यांचे कटिंग केलं पाहिजे, अशा शब्दात अजित पवार यांनी दोन्ही घटनेवर संताप व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, पूर्वीएवढं आता मला बारामतीला येता येत नाही, पण गणपती बसणार त्या दिवशी मी बारामतीत आहे.
मी आपल्या भागात चांगले करण्याचा प्रयत्न केला आणि करतो. पुढच्या गोष्टी घडायच्या त्या घडतील.
२८७ मतदारसंघातील जेवढे आकडे आहेत, तेवढा बारामतीच्या निधीचा आकडा आहे.

बारामतीत नाईट लँडिंग करून घेतोय, बारामतीत कुठंही थुंकायचं नाही.
सध्या जिथं बस डेपो आहे तिथं आम्ही कॅन्सर हॉस्पिटल करतो आहे.
काम करण्याची धमक नेतृत्वामध्ये असली पाहिजे, असे म्हणत विकासावर भाष्य करा,
असे आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed