Narayan Rane On Uddhav Thackeray | दिशा सालियन प्रकरणी नारायण राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – “उद्धव ठाकरेंनी मला फोन करून…”

Narayan Rane-aditya uddhav thackeray

मुंबई : Narayan Rane On Uddhav Thackeray | मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed ). दरम्यान त्याठिकाणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मविआचे नेते पाहणी करायला गेले असता नारायण राणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पत्रकार परिषद घेत खासदार नारायण राणे यांनी घटनाक्रम सांगितला आहे.

महाराष्ट्रात संतप्त वातावरण आहे. पण हे हेतूपरस्पर आहे. हे रचलेलं षडयंत्र आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले म्हणजे मिंदे? जेव्हा तुमच्याकडे असताना बॅगा पोहचवत होता तेव्हा ते चांगले होते. एकनाथ शिंदेनी ठरवलं तर महाराष्ट्र अस्थिर करतो म्हणून ते तुमच्या विरोधात तडीपारीची नोटीस काढू शकतात. मी असतो तर कधीचं केल असतं, असं म्हणत खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी दिशा सालियन प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

नारायण राणे म्हणाले, आम्ही त्यांना परदेशी घड्याळं दाखवली. आमची एक ट्रिप अशी नाही झाली की त्यांनी लेदर पट्ट्याचे घड्याळ आणलं नाही. उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये. मी असो किंवा एकनाथ शिंदे असो मातोश्रीवर पैसे पोहचवण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दिशा सालियन प्रकरणी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिशा सालियन प्रकरणी (Disha Salian Case) उद्धव ठाकरेंनी मला दोन वेळा फोन केले. साहेब तुम्हाला पण मुलं आहेत, हे प्रकरण लावून धरू नका. मी म्हणालो की तुझ्या मुलाला उठण्या बसण्याच्या जागा ठरवून दे. त्या फोटोत मंत्र्यांची गाडी कशी होती, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. यानंतर आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

नारायण राणे पुढे म्हणाले की, मशालीचे दोन उपयोग आहेत.
एक उजेडासाठी आणि दुसरा भस्मसात करण्यासाठी होतो. काय आहे ते त्याने स्पष्ट करावं.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्राच्या हिताची नाही. तर दुसरीकडे संजय राऊत आगलाव्या आहे.
तो पेट्रोल घेऊन फिरतो, असं नारायण राणे यांनी सांगत ठाकरे आणि राऊत यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed