Vanraj Andekar Murder | एनसी ते मर्डर : वनराज आंदेकर याच्या खूनाचा प्रवास

Vanraj-Andekar

पुणे : Vanraj Andekar Murder | किरकोळ भांडणांमध्ये पोलीस एनसी (अदखलपात्र गुन्हा) दाखल करतात आणि तेवढ्यापुरता तोडगा काढतात. अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये लक्ष दिले. त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली तर, पुढील मोठे गुन्हे टळू शकतात, अशी शिकवण अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या सहकार्‍यांना देत असतात. वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणाचा प्रवास अशाच एका एनसी (अदखलपात्र गुन्हा) वरुन खूनापर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुख्यात गुंड व वनराजचे वडिल सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर (Suryakant Alias Bandu Andekar) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यात याचा उलगडा झाला आहे.

बंडु आंदेकर याची मुलगी संजिवनी जयंत कोमकर (Sanjivani Jayant Komkar) व जावई जयंत लक्ष्मण कोमकर (Jayant Laxman Komkar) यांच्या अक्षता-अंकिता जनरल स्टोअर्स या दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई वनराज याच्या सांगण्यावरुन केली असल्याचा संशय संजिवनी व जयंत कोमकर यांना होता. त्यानंतर १ सप्टेबर रोजी दुकानावर दगडफेक केली म्हणून तक्रार करण्यासाठी संजिवनी व जयंत कोमकर समर्थ पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आकाश सुरेश परदेशी (Akash Suresh Pardeshi) याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी आकाशबरोबर वनराज, पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर (Shivam Udaykant Aandekar) व अ‍ॅड. मनोज माने (Adv Manoj Mane) हे पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी संजिवनी व तिचा पती जयंत कोमकर यांनी आकाश याला पोलीस ठाण्याच्या आवारात लाथाबुक्क्यांनी व चप्पलेने मारहाण केली.

पुतण्या शिवम आंदेकर याने ही भांडणे सोडवली. त्यावेळी वनराज याच्या सांगण्यावरुन आकाश याने तक्रार दिली. पोलिसांनी एनसी (अदखलपात्र) अशी नोंद केली. वनराजच्या सांगण्यावरुन ही तक्रार नोंदविली गेल्याने संजिवनी हिने पोलीस ठाण्यात ‘‘वनराज आम्ही तुला जगु देणार नाही. तू आमच्यामध्ये आला आहे. तू आमचे दुकान पाडण्यास सांगून आमचे पोटावर पाय देतोय काय, तुला आज पोर बोलावून ठोकतेच,’’ असे म्हणाली.

या घटनेनंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वनराज व पुतण्या शिवम हे उदयकांत आंदेकर चौकात थांबलेले होते. त्यावेळी दुचाकीवरुन काही जण आले. शिवम व वनराज पळून जाऊ नये, अशा पद्धतीने तिघे समोरच थांबले. त्यानंतर आणखी काही दुचाकी वरुन टोळके आले. दुचाकीवरील मध्यभागी असलेल्याने तोंडावरील मास्क खाली केला तेव्हा तो पवन करताल असल्याचे शिवम याने ओळखले. त्याने कमरेला लावलेले पिस्तुल काढून शिवमवर फायरिंग केले. परंतु शिवम सावध असल्याने तो खाली बसला. त्यामुळे तो वाचला. पवन याने वनराज याच्यावर फायरिंग केले. दुसर्‍या गाडीवरुन आलेल्या समीर काळे याने देखील पिस्तुल काढून वनराज याच्या दिशेने फायरिंग केले.

परंतु, त्यांचा नेम चुकला. वनराज व शिवम पळून जाऊ लागले. तेव्हा संजिवनी कोमकर व जयंत कोमकर यांनी राहत्या घराच्या बाल्कनीत उभे राहून ”मारा मारा त्यांना सोडू नका जिवे ठार मारा,” असे म्हणून त्यांना चिथावणी दिली. त्यावेळी गाडीवरील इतरांन त्यांच्या बरोबर आणलेले कोयते हवेत फिरवून पवन करताल याने ”एक वर एक फ्री बोनस” असे बोलून त्यांच्या अंगावर धावले. तेव्हा शिवम हा पुढे पळून गेला. पण वनराज हा पळताना खाली पडला. आणि हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. तेव्हा पवन करताल, समीर काळे व इतरांनी वनराज याच्या चेहर्‍यावर, डोक्यावर, मानेवर, छातीवर, हातावर वार करुन त्याला जीवे ठार मारले. सूर्यकांत आंदेकर यांनी वनराजच्या खूनाबद्दल १५ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. आपल्याच बहिणीने व दाजीने सकाळी धमकी दिली असतानाही बेसावध राहिल्याने व ऐनवेळी पळून जाता न आल्याने वनराज आंदेकर याला आपला जीव गमवावा लागल्याचे दिसून आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed