Pune Crime Branch News | बोलेरो पिकअपमधून होत होती गावठी दारुची वाहतूक ! दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने पकडली 4 लाख 12 हजारांची दारु
पुणे : Pune Crime Branch News | कोंढवा-कात्रज रोडवर (Katraj Kondhwa Road) बोलेरो पिकअप वाहनातून गावठी दारुची वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही पिकअप व्हॅन पकडली असून त्यातील ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त केली आहे. भगत गणेश प्रजापती Bhagat Ganesh Prajapati (वय २४, रा. बगळे मळा, उरळी कांचन) याला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime Branch News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदिपान पवार (PI Sandipan Pawar) यांचे पथक गुन्हे प्रतिबंध गस्त करीत होते. कात्रज – कोंढवा रोड बायपासने ते जात असताना पोलीस अंमलदार विनय येवले यांना एका बोलेरो पिकअप गाडी संशयरितया जाताना दिसली. त्यांनी गाडी थांबून आतील बाजूला चेक केले तर त्यात १ लाख ५७ हजार ५०० रुपयांची ४५ प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटर अशी एकूण १५७५ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु मिळून आली.
पोलिसांनी या दारुसह मोबाईल, बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त
केला आहे. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी पथकातील
पोलीस निरीक्षक संदिपान पवार, तसेच सहायक पोलीस निरीक्षक बेरड,
पोलीस अंमलदार विनय येवले यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक