Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन; भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Murder In Gultekdi Pune

पुणे : Gultekdi Pune Crime News | पुणे शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder) याच्या खुनानंतर गेल्या तीन दिवसात तिसर्‍या खुनाची घटना समोर आली आहे. मोक्कातून सुटलेल्या गुंडांनी एका तरुणावर वार करुन त्याचा खून केला. आरोपींची भावाशी पूर्वी भांडणे होती. त्याला मारण्यासाठी आरोपी आले होते. भावाला वाचविण्यासाठी गेलेल्यावर चाकूने वार झाल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. (Murder In Gultekdi Pune)

https://www.instagram.com/p/C_e8AZQC4vV

सुनील सरोदे (वय २०, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोक्कातून जामिनावर सुटलेल्या रोहन कांबळे, साहिल कांबळे यांनी साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आले आहे. स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे.

पूर्वीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट (Dice Plot Gultekdi) येथे राहतो. त्याचा भाऊ व आरोपी यांची पूर्वी भांडणे झाली होती. साहिल कांबळे यांच्यावर मोक्का अंतर्गत (Pune Police MCOCA Action) कारवाई करण्यात आली होती. त्याची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर आता पोलीस साहिल कांबळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारी होते. त्याच्या अगोदरच त्याने डायस प्लॉटवर मध्यरात्री राडा घातला. (Swargate Police Station)

रोहन कांबळे, साहिल कांबळे हे साथीदारासह सुनिल सरोदे याला मारण्यासाठी डायस प्लॉटला आले होते. ते भावाला मारत असताना सुनिल सरोदे हा त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडला. तेव्हा सुनिल याच्या मानेवर चाकूचा वार आरोपी केला. हा घाव वर्मी लागला. त्यात त्याची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी सांगितले. (Gultekdi Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed