Congress On Ladki Bahin Yojana | ‘आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे २ हजार रुपये करू’, काँग्रेसचे आश्वासन
सांगली : Congress On Ladki Bahin Yojana | | महिला सक्षमीकरणा करिता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जात आहेत. महायुती सरकारने ही योजना सुरु केल्यापासून या योजनेची राज्यभर चर्चा सुरु आहे.
मविआचे नेते या योजनेवरून महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी सांगली येथे झालेल्या सभेत आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे २ हजार रुपये करू असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ” खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे, त्यांच्या बाजूने सर्व नकली आहेत. आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला २ हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहात का, मोदी सरकारने तोडण्या- फोडण्याच्या पलीकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपाचे सरकार जाईल, या शब्दांत खरगे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे १ लाख ७० हजार मतांनी जिंकले आहेत.
मात्र, विश्वजित कदम हे एका विधानसभेत १ लाख ४० हजार मतांनी जिंकले, असे सांगत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा