Ajit Pawar NCP | विधानपरिषदेच्या आमदार निवडीवरून राष्ट्रवादीत वाद; सुनील तटकरे म्हणाले – “निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय…”
मुंबई : Ajit Pawar NCP | विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागांमध्ये भाजपाला ६, शिंदे सेनेला ३, तर अजित पवार गटाला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. दरम्यान अजित पवार गटाने आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांवरील नावे निश्चित केल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) आणि सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. (NCP Conflict)
त्यावरून आता पक्षातीलच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी आक्षेप घेतला. रुपाली पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. ‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायानुसार आमचे अजित पवार हे न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले.
पक्षाला कळकळीची विनंती की, राष्ट्रवादीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने,दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांना समान संधी द्यावी, असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाकडे विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.
या एकूण प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, ” राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय अद्याप झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज व निवेदने दिलेली आहेत. (Ajit Pawar NCP)
अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात.
याबाबत, अद्याप कुठलीही चर्चा संसदीय मंडळात झालेली नाही.
पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
त्यामुळे कोणीही याबाबतचे आपले मत अथवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाकडे देऊ नये “, असे तटकरे यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी