Garima Silent Candle March | पुण्यात ‘गरिमा सायलेंट कॅण्डल मार्च’ या कार्यक्रमाचे आयोजन; समाजामध्ये ‘झिरो टॉलरन्स’ हा विचार रुजविण्याची गरज – न्यायाधिश एस.बी. राठोड

Garima Silent Candle March

पुणे : Garima Silent Candle March | रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे साम्राज्य (Rotaract Club Of Pune) व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे (District Legal Services Authority Pune) यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील महिला सुरक्षा व गोपनियता या विषयाला अनुसरून (दि.५) रोजी ‘गरिमा सायलेंट कॅण्डल मार्च’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मा. प्रधान जिल्हा न्यायाधिश व जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण पुणे चे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयातील सर्व महिला न्यायीक अधिकारी, वकील, कलाकार, विद्यार्थी, विविध रोटरॅक्ट क्लबचे सभासद व समाजातील सर्व स्तरांतुन असंख्य लोक सहभागी झाले होते.

सदर कॅण्डल मार्चसाठी प्रमुख अतिथी म्हणून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस.बी. राठोड Judge S.B. Rathod (स्पेशल कोर्ट पॉस्को), जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल एस. पाटील (Sonal S. Patil), मराठी अभिनेते प्रसाद सुर्वे (Prasad Surve) यांसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

https://www.instagram.com/reel/C_ktstJpvgA/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

या कार्यक्रमाचे समन्वयक ऍड. सत्यजीत कराळे पाटील यांनी सांगितले की, हा कॅण्डल मार्च फक्त निषेध नसुन या कॅण्डल मार्चमध्ये सर्वांनी स्वतःच्या विचारांचा विकास करावा असा संदेश यामधुन घ्यायचा आहे. आज समाजामध्ये अनेक वाईट प्रवृत्तीचे लोक आपल्या आजुबाजुला वावरत असतात परंतु समाजात बदल घडविण्यासाठी आधी आपल्या स्वतःमध्ये बदल घडविणे, स्वतःचा दृष्टीकोन बदलणे हे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपण एक न्यायाधिश म्हणून प्रथमच अशा उपक्रमामध्ये सहभागी झालो आहोत व त्याचा मला आनंद आहे. आम्ही न्यायाधिश म्हणून आमच्या परिने चांगला व जलद न्याय कसा देता येईल यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. परंतु आज आपल्या समाजामध्ये “झिरो टॉलरन्स” हा विचार रुजविण्याची गरज आहे आणि या कॅण्डल मार्चमध्ये हा विचार समाजामध्ये जाईल याची मला शाश्वती आहे “, असे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस.बी. राठोड यांनी म्हंटले.

हा कॅण्डल मार्च यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे साम्राज्य चे अध्यक्ष अजित चौधरी, सचिव संजना वलंजु, संचालक प्रथमेश बोरुडे, आकांक्षा थोरात, शर्वरी कोंडे, अफरोज जहागीरदार, शिवानी वाघमारे व इतर सर्व सभासदांनी योग्य ते नियोजन केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed