Vinesh Phogat-Bajrang Punia Join Congress | कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आता राजकीय आखाड्यात; दोघांनी केला काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
ऑनलाइन टीम – Vinesh Phogat-Bajrang Punia Join Congress | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर भारताचे माजी कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणूक 5 ऑक्टोबर रोजी होणार असून दोघांनाही काँग्रेसचे तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
फोगाट आणि पुनिया यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी दोघांनी पक्षात जाहीरपणे प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेरा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया उपस्थित होते. पक्षात प्रवेश केल्यानंतर फोगाट म्हणाल्या की, ” कोर्टात लढा सुरूच आहे. तो अजून संपलेला नाही. आम्ही तो लढा ही जिंकू. आज ते नवीन व्यासपीठ मिळत आहे, त्यासोबत आम्ही काम करू. देशाच्या सेवेसाठी, आमच्या लोकांसाठी आम्ही सर्वोत्तम काम करू, जर तुमच्यासाठी कोणी नसेल, तर मी तिथे असेल, काँग्रेस पक्ष असेल.” असे ही फोगाट म्हणाल्या.
पक्ष प्रवेशापूर्वी शेतकरी आंदोलनात सहभाग
दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी फोगाट यांनी शंभू आणि खनौरी सीमेवर जाऊन शेतकर्यांना पाठिंबा दर्शवला होता.
त्यावेळी त्यांना निवडणूक लढवणार का ? असा प्रश्न करण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या की, मला राजकारण कळत नाही,
पंरतू शेतकर्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. (Vinesh Phogat-Bajrang Punia Join Congress)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी