Gulabrao Patil Slams Finance Department Maharashtra | अर्थ सारखे नालायक खाते पाहिले नाही’ – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil-Ajit Pawar

ऑनलाइन टीम – Gulabrao Patil Slams Finance Department Maharashtra | ” आमची फाईल अर्थ खात्याकडे दहावेळा गेली आणि त्यांच्याकडून ती माघारी पाठवण्यात आली. अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही.” असे म्हणत शिंदेसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जळगावमध्ये अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर निशाणा साधला. (Shivsena Shinde Group Minister)

जळगावमध्ये हात पंप आणि वीज पंप दुरूस्ती आणि देखभाल संघटनेच्या वतीने गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अर्थ खात्याच्या कारभाराविषयी उघड नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले की, ” खरं तर मी असं म्हणायला नको. टीव्हीवाले आणि पत्रकारांची मी आधीच माफी मागतो. त्यांनी ही बातमी नाही दाखवली तर बरं होईल. पण अर्थ खात्यासारखं नालायक खातं दुसरं नाही. आमची फाईल १० वेळा अर्थ विभागाकडे गेली. पण मी पण पक्का आहे. खात्यात फाईल गेली की मी माणूस पाठवायचो. शेख वहा जा के देख क्या चल रहा है. शेख तू आगे का देख. मे तेरे पिछे है, असं त्याला सांगायचो. तिथे जाऊन आमची फाईल निगेटिव्ह होऊन व्हायची. पण मी पिच्छा सोडला नाही. आमच्या लोकांनी पिच्छा सोडला नाही. जर हे पाच-सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर मीही माझ्या कामाच्या व्यापात दुर्लक्ष केलं असतं. सतत फॉलो अप घेणारा माणूस असला की काम होतं,’ असा घटनाक्रम त्यांनी सांगितला. (Ajit Pawar)

नेमकं कोणत्या अर्थ खात्याबद्दल बोलायचयं?

अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी म्हटले आहे की, ‘गुलाबराव पाटील जबाबदार मंत्री आहेत. ते नेमकं कोणत्या अर्थ खात्याबद्दल बोलताहेत? राज्यातील की केंद्रातील? की इन जनरल अर्थ विभागाबद्दल बोलताहेत? हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. अर्थ खात्यामधून सर्वाधिक निधी जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्यांच्या खात्याला मिळालेला आहे. त्यामुळे ते राज्याच्या अर्थ खात्यासंदर्भात बोलत असतील असं वाटत नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed