Katraj Pune Crime News | तडीपार गुंडाचा भावावर हल्ला; पैसे देण्यासाठी दहशत माजविणार्‍या गुंडाला अटक

marhan

पुणे : Katraj Pune Crime News | तडीपार केले असतानाही (Tadipar Criminal) पुण्यात येऊन पैशांसाठी भावांवर हल्ला करुन दहशत माजविणार्‍या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अटक केली आहे.

तानाजी राजाभाऊ जाधव (वय ३८) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत बालाजी राजाभाऊ जाधव (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना संतोषनगरमध्ये ४ सप्टेबर रोजी रात्री दहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ तानाजी जाधव याला दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. तो त्या कालावधीत सोलापूर येथे रहायला आहे. फिर्यादी हे सेट्रींगचे काम करतात. फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह घरात असताना त्याचा तडीपार भाऊ तानाजी जाधव हा घराबाहेर आला. त्याने फिर्यादी यांना घराचे बाहेर बोलावले. त्यास जेवणासाठी व सोलापूर येथे पुन्हा जाण्यासाठी पैसे पाहिजे होते. फिर्यादी यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचा लहान भाऊ धनाजी जाधव घरातून बाहेर आल्यावर त्यालाही तानाजी मारु लागला. दोघांनी त्याला विरोध करीत असतानाच त्याने कमरेला लपवून ठेवलेला कोयता काढून त्यांच्यावर उगारला. तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर तुम्हाला या ठिकाणीच मारुन टाकतो, अशी धमकी दिली. घराबाहेरील रोडवर जाऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना धमकावून शिवीगाळ करु लागला. त्याचवेळी पेट्रोलिंग करणारे पोलीस तेथे आले. त्यांना पाहून तानाजी पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला कोयत्यासह पकडले. (Katraj Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed