Manipur Drone Attack | मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर कुकी अतिरेक्यांचा रॉकेट बॉम्ब हल्ला, एकाचा मृत्यू

Manipur Drone Attack

पुणेरी आवाज – Manipur Drone Attack | मणिपूरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मारेम्बम कोईरेंग यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता कुकी अतिरेक्यांनी रॉकेट बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले असल्याची माहिती सांगितली जात आहे. काँग्रेस नेते मारेम्बम कोईरेंग हे मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री होते. (Manipur Violence)

मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांचे घर आहे. घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रॉकेट घराच्या भिंतीवर आदळले आणि लगेचच त्याचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, कुकी-झोमी बहुसंख्य चुराचंदपूर जिल्ह्यात उंच स्थानांवरून ट्रोंगलाओबीच्या सखल निवासी भागाकडे अशा प्रकारचे रॉकेट डागण्यात आले. (Manipur Drone Attack)

मणिपूरमधील शाळा बंद

दरम्यान, मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने ७ सप्टेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शुक्रवारी शिक्षण मंत्रालयाने एक आदेश जारी केला असून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि केंद्रीय शाळा ७ सप्टेंबर रोजी बंद राहतील असं आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, ड्रोन आणि आता रॉकेटच्या हल्ल्यांनंतर मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इम्फाळ जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ही झाले होते बॉम्ब हल्ले

काही दिवसांपू्र्वी मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील काही भागात अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले होते. या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता तर १० जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. या गोळीबाराच्या आणि बॉम्ब हल्ल्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या अनेक घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गोळीबार झालेल्या कौत्रुक गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed