MH Vidhan Sabha Election | विधानसभेसाठी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या; १७२ मतदारसंघाचा आढावा पूर्ण; मविआमध्ये एक पाऊल पुढे
मुंबई: MH Vidhan Sabha Election | आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कधीही निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी परिस्थिती आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या राजकीय पक्षांकडून युती, आघाडी आणि उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. (Congress Maharashtra)
दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसची विशेष बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून पक्षाकडून आतापर्यंत १७२ जागांचा आढावा घेतल्याची माहिती पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी पत्रकार परिषदेत दिली. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदारसंघाचा आढावा पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
” राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे. हत्या, दरोडे, महिलांवरील अत्याचारांत वाढ झालेली आहे. पुण्यात तीन दिवसांत दोन हत्या झाल्या. महागाई आवाक्याबाहेर गेल्याने सण साजरे करणे अवघड झाले आहे. जनता त्रस्त आहे. पण महायुती सरकार (Mahayuti Govt) मात्र घोटाळे करून पैसे वसुल करण्यात व्यग्र आहे “, अशी टीका चेन्निथला यांनी केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी