Mahayuti News | अंतर्गत वादामुळे महायुतीच्या प्रतिमेस धक्का; नेतृत्वाने घेतला मोठा निर्णय

Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar

मुंबई: Mahayuti News | महायुतीत सहभागी असलेल्या पक्षातील नेते मित्र पक्ष असलेल्या नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे सातत्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेत निर्माण होत आहेत. महायुती बरोबरच बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे त्यांचे पक्षही अडचणीत येत असल्याची तिन्ही घटक पक्षाची भावना आहे.

शिवसेना नेते (Shivsena Shinde Group) आणि मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर (Ajit Pawar NCP) खालच्या पातळीवर टीका करत आहेत. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाचे एक-एक मुख्य प्रवक्ते महायुतीकडून नियुक्त केले जाणार आहेत. तिन्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते जे बोलतील तीच महायुतीची अधिकृत भूमिका असेल. या प्रवक्त्यांशिवाय इतर कोणाचीही अधिकृत भूमिका नसणार, असा निर्णय महायुतीने घेतल्याची माहिती मिळत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed