Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा; राजकीय समीकरणं बदलणार; कोणाला फटका बसणार ?

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर राज्यातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी स्पेस निर्माण झाली आहे. ही स्पेस घेण्यासाठी आता छोटे राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. त्यामुळेच राज्यात तिसरी आघाडी (Third Front In Maharashtra) स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आता अभूतपूर्व घडामोडी घडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) प्रचंड अपयश मिळालं. या निवडणुकीत मोदी लाट पूर्णपणे फेल गेल्याने छोट्या छोट्या राजकीय पक्षांचं बळ वाढलं आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार आहे.
राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघडीची चाचपणी सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhaji Raje) , बच्चू कडू (Bachchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti), डॉ. राजरत्न आंबेडकर (Dr Rajratna Ambedkar), नारायण अंकुशे (Narayan Ankushe) हे तिसऱ्या आघाडीतील नेते असणार आहेत. उद्यापासून हे नेते दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील युती किंवा आघाडीसोबत जाण्याची चाचपणी सुरु केली आहेत. त्यातच राज्यात तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हा दौरा करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
नांदेड आणि परभणी दौऱ्यावर छत्रपती संभाजीराजे (स्वराज्य पक्ष प्रमुख), बच्चूभाऊ कडू (प्रहार पक्ष प्रमुख), राजू शेट्टी साहेब (स्वाभिमानी शेतकरी संघटना), डॉ. राजरत्न आंबेडकर (अध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) आणि नारायण अंकुशे (अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी) हे नेते असणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेणार आहेत.
छोट्या राजकीय पक्षांनी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जागा वाटपासाठी बोलणी सुरु केली आहे.
मात्र, आधीच युती-आघाडीमध्ये तीन-तीन पक्ष असल्याने छोट्या पक्षांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रमुख नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी छोटे पक्ष विविध पर्याय अवलंबत आहेत.
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला देखील याच नजरेतून पाहिलं जात आहे.
विधानसभेला देखील ही आघाडी दिसून येते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी