Ramdas Kadam On Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरेंना अद्याप शरद पवार कळले नाहीत, भलेभले थकले”, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “बाळासाहेब ठाकरे माझे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करतील म्हणून…”

रत्नागिरी : Ramdas Kadam On Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्याबरोबर काही आमदार घेऊन भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले. (Shivsena Shinde Group)
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) एकमेकांवर जहरी टीका करताना पाहायला मिळतात. “उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे दिसतात तेवढेच ते प्रचंड लबाड आहेत.
काँग्रेसच्या नादाला लागून आणि शिवसेनाप्रमुख्यांच्या विचारांविरोधात जाऊन काय होते याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत्या विधानसभेला कळेल”,अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाआहे.
माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, २००९ मध्ये मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. विरोधी पक्षनेता म्हणून कदाचित बाळासाहेब ठाकरे माझे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करतील त्यामुळे मला गुहागरमध्ये पाडण्याचे पाप हे उद्धव ठाकरेंनीच केले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. संधी मिळूनही अडीच वर्ष कूचकामी ठरले.
जनतेच्या भल्यासाठी त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही तर त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. अडीच वर्षात २ दिवसही मंत्रालयात गेले नाहीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करणं किती चुकीचे आहे हे महाराष्ट्र पाहतोय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची घाई लागली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अमित शाह (Amit Shah) जर भिंतीच्या आड मुख्यमंत्रिपदाबाबत बोलले असतील तर तुम्ही त्यावर बाहेर पत्रकार परिषदेत का सांगितले नाही. तुमच्यासमोर अमित शाह सांगतायेत पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असतील मग तुम्ही त्यांना का थांबवलं नाही? फक्त मुख्यमंत्री बनणं एवढीच राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे यापलीकडे त्यांच्याकडे महाराष्ट्र हिताच्या अशा कुठल्याही बाबी नाहीत. मी त्यांना जवळून अनुभवलं आहे.
उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे दिसतात तेवढेच ते प्रचंड लबाड आहेत. उद्धव ठाकरेंना अद्याप शरद पवार (Sharad Pawar) कळले नाहीत. भलेभले थकले, शरद पवार काय हे लवकरच उद्धव ठाकरेंना समजेल. काँग्रेसच्या नादाला लागून आणि शिवसेनाप्रमुख्यांच्या विचारांविरोधात जाऊन काय होते याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत्या विधानसभेला कळेल असा टोलाही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, दरम्यान, राजकारणात गेल्यानंतर नात्यात १०० टक्के वैमनस्यच आणायचे हे चुकीचे आहे.
नातीगोती सांभाळूनही राजकारण होऊ शकते, हा महाराष्ट्र आहे बिहार नाही.
अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेले विधान चांगलेच आहे.
जोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेससोबत आहेत तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही हे मी आधीच सांगितले होते
आता पुलाखाली एवढे पाणी गेलंय त्यामुळे दोन शिवसेना एकत्र येणं अशक्य आहे.
आमची बांधिलकी बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) होती, उद्धव ठाकरेंची नाही.
बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेण्याचं काम काँग्रेससोबत जात उद्धव ठाकरेंनी केले त्यामुळे त्यांनी नाते तोडले.
दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या पायाशी बसायचं, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती द्यायची त्यामुळे आमचे त्यांचे नाते शिल्लक नाही.
आम्हाला शिवसेनाप्रमुखांचा भगवा झेंडा प्यारा, भगव्या झेंड्याला अधिक तेज कसं येईल त्यासाठी प्रयत्न करणार
पण बाळासाहेबांचा भगवा झेंडा आम्ही सोडणार नाही जो उद्धव ठाकरेंनी सोडलाय”, असेही रामदास कदमांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी