Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्या महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयात (Shivaji Nagar Pune Court) महिलेच्या जामिनासाठी बनावट सात बाराचा उतारा सादर करुन फसवणूक (Cheating Fraud Case) करणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंदाकिनी भानुदास लाळे Mandakini Bhanudas Lale (रा. अभिरुची सिटी, आम्रपाली सोसायटी, वडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक १ मधील ज्युनिअर क्लार्क प्रशांत तायडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात आरोपी शोभा विजय शेडगे यांचा जामीन स्वीकारण्याकरीता मंदाकिनी लाळे (वय ६६) यांनी न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले होते. हे प्रतिज्ञापत्र सादर करताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच शिवणे गावातील ७/१२ उतार्याची प्रत सादर केली होती. ही ७/१२ उत्तार्याची प्रत न्यायालयाने अवलोकन केली असता त्यात काही हस्त लिखित नोंद पाहून त्यांची सत्यता तपासण्यास सांगितले. महसुल विभागच्या ऑनलाईन भूमी अभिलेख या सरकारी वेबसाईटवर पाहणी केली असता हा ७/१२ उत्तारा कालावली भागुजी शेडगे यांच्या नावावर असल्याचे दिसून आले. त्यामुळे जामीनदारांनी तिच्या प्रतिज्ञापत्रामध्ये खोटे विधान केले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे खोटी कागदपत्रे सादर करुन न्यायालयाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shivaji Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी