Pune Crime Branch News | अल्पवयीनाकडून दुचाकी, 7 मोबाईल हस्तगत ! 6 मोबाईल हँडसेट मालकांचा शोध सुरु

पुणे : Pune Crime Branch News | अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने एका अल्पवयीन मुलाकडून चोरीची दुचाकी आणि ७ मोबाईल हस्तगत केले आहेत. (Mobile Theft Case)
गुन्हे शाखेचे युनिट ३ चे पथक उत्तरनगर परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी व चोरी मोबाईल हँडसेट विकण्यासाठी येणार आहे. या माहितीवरुन पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. (Vehicle Theft Detection)
त्याच्याकडून जप्त केलेली अॅक्सेस मोपेड चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीतून चोरली होी़ तसेच केटिएम आर सी १५ ही दुचाकी सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरातून चोरीला होती. मोबाईल हँडसेटपैकी एका मोबाईलबाबतचा गुन्हा उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) दाखल असल्याचे आढळून आले. त्याचेकडून १ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अन्य मोबाईल हँडसेटबाबत तपास सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार (Rangrao Pawar), पोलीस उपनिरीक्षक महेश कोकाटे (Mahesh Kokate), पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजीव कळंबे, केदार आढाव, गणेश सुतार, विनोद जाधव, सोनम नेवसे, सुजित पवार, प्रतिक मोरे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, हरिश गायकवाड, राकेश टेकावडे, इसाक पठाण यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा