Pune Crime News | जादा परताव्याच्या आमिषाने 121 गुंतवणुकदारांना घातला 9 कोटींना गंडा ! साई इंडस मार्केटिंग व साई मल्टी सर्व्हिसेसच्या मालकावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | गुंतवणुकीवर दरमहा ४ ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) त्याने लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. पोस्ट डेटेड चेक्स देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. अशा प्रकारे १२१ गुंतवणुकदारांची ९ कोटी रुपयांची फसवणूक करुन तो पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
याप्रकरणी विजयकुमार मुरलीधर घाटे (वय ५४, रा. अहिरे, खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भालचंद्र महादेव अष्टेकर Bhalchandra Mahadev Ashtekar (रा. वडगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र अष्टेकर याने आंबेगाव व्हॅली येथे साई इंडस मार्केटिंग (Sai Indus Marketing) व साई मल्टी सर्व्हिसेस (Sai Multi Services) या नावाने गेल्या वर्षी कंपनी सुरु केली. फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना ४ ते १५ टक्के दरमहा दराने परतावा दिला जाईल व मुळ रक्कम दुप्पट करुन दिली जाईल असे आमिष दाखविले. त्याबाबत पोस्ट डेटेड चेक्स गुंतवणुकदारांना देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी त्यांच्या कंपनीत १० लाख रुपये गुंतविले. मुदतीनंतर त्याने दिलेले धनादेश बँक खात्यात पैसे नसल्याने ते परत आले. अशा प्रकारे १२१ गुंतवणुकदारांची ९ कोटी २ लाख ७३ हजार ८०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भुजबळ अधिक तपास करीत आहेत. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
