Pune Railway Security | घातपाताची शक्यता लक्षात घेऊन ‘आयबी’ने रेल्वे प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना; ट्रॅकवर 20 ठिकाणी बसविले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे

Pune-Railway

पुणेरा आवाज – Pune Railway Security | देशात सर्वत्र गणेशोत्सव साजारा होतोय. या दरम्यान दहशतवाद्यांकडून घातपात करण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असतानाच गुप्तचर यंत्रणेकडून रेल्वे प्रशासनाला रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानूसार आता ट्रॅकवर 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. (Intelligence Bureau Give Important Instructions To Pune Railway Administration)

काही दिवसांपूर्वी सोलापुर विभागातील कुर्डुवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात करण्यासाठी काही व्यक्तींनी रेल्वे ट्रॅकवर सुमारे 230 किलोचे स्लिपर ठेवले होते. सुदैवाने गँगमनने वेळीच हे पाहिले आणि त्याने स्लिपर ट्रॅकवरून हटविले. अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता आली नसती. तिकडे उत्तरप्रदेश कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेसचा अपघात करण्यासाठी ट्रॅकवर गॅस सिलिंडर, पेट्रोलने भरलेली बाटली आणि एका पिशवीत ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आला होता. यात घातपाताचा संशय असल्याने राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तपास सुरू केला आहे. ( Pune Railway Security)

या घटनांच्या पाश्वभूमीवर रेल्वेच्या सुरक्षा बलाची नुकतीच केंद्रीय गुप्तचर विभागासोबत (आयबी) नुकतीच बैठक झाली असून त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाला संशयित ठिकाणे सांगितली असून प्रामुख्याने त्याठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच रेल्वे इंजिनमध्ये देखील कॅमेरे बसविण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित घटना वेळीच रोखणे शक्य होईल. याशिवाय संवेदनशील भागात गस्त देखील वाढवण्यात येणार आहे. असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed