Supreme Court On Dhol Tasha Pathak Pune | आता ढोल पथकांमध्ये ३० पेक्षा जास्त वादक राहणार; सुप्रीम कोर्टाचा आदेश; म्हणाले – ‘त्यांना वाजवू द्या, पुण्याच्या हृदयात…’

पुणे: Supreme Court On Dhol Tasha Pathak Pune | पुण्यामध्ये अनेक मंडळांकडून पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Visarjan Miravnuk) काढली जाते. मिरवणुकीमध्ये ढोल, ताशांचा समावेश असतो, तेच मुख्य आकर्षण असतं. मात्र ढोल ताशा पथकामध्ये ३० पेक्षा जास्त वादक नसावेत असा आदेश (३० ऑगस्ट) हरित लवादाने दिला होता.
आता सुप्रीम कोर्टाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धंनजय चंद्रचूड (D.Y. Chandrachud) यांच्या खंडपीठाने आज (दि.१२) याबाबत स्थगिती आदेश दिला आहे. (Supreme Court On Dhol Tasha Pathak Pune)
वादकांच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हंटले आहे. त्यांना त्यांचे ढोल, ताशा वाजवू द्या, कारण ढोल, ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे, अशा शब्दात कोर्टाने ढोल,ताशांचं समर्थन केलं आहे. गणेश उत्सव सुरु असताना कोर्टाने दिलेल्या या निकालाने मोठा दिलासा मिळाला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा