Sitaram Yechury Passes Away | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन

दिल्ली: Sitaram Yechury Passes Away | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांची प्रकृती खालावल्यामुळे मंगळवार, (दि. १०) रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (दि.१२) अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ताप, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच ७२ वर्षीय येचुरी यांचे निधन झाले.
न्यूमोनिया आणि छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.
विद्यार्थी चळवळीतून त्यांचे नेतृत्व पुढे आले होते. सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलने झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला परखड शब्दात जाब विचारला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा