Maharashtra Assembly Election 2024 | ‘मविआच्या 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू नये’, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य; म्हणाले – ‘महाविकास आघाडीत मोठा भाऊ…’

Mahavikas-Aghadi

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची तयारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) सुरु आहे. दरम्यान जागावाटपावरून बैठका सुरु आहेत. निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. “आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १८० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका “, असे विधान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ” आमच्या दोन-तीन बैठका आत्तापर्यंत झाल्या आहेत. या बैठकीमध्ये १२५ जागांवर सहमती असल्यास दिसून आलंय. इतर जागांवर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. एमआयएमबाबत (MIM) कोणता प्रस्ताव दिला आहे याची मला माहिती नाही.

मात्र असं काही असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. आमचे जागा वाटप लवकरच पूर्ण होईल आणि राज्यात महाविकास आघाडी १८० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका”, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले,” महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर खऱ्याखुऱ्या लढती सध्या सुरू आहेत. त्यांच्यात सगळ्यांना पुढे जायचं आहे कोणी मागं जायला तयार नाही. आमच्या जागा वाटपात आम्ही देखील आग्रह धरू. मात्र जो काही निर्णय असेल तो सहमतीनेच घेतला जाईल. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? अशी चर्चा आम्ही कधीच करत नाही”, असे त्यांनी म्हटले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed