Ajit Pawar NCP | ठरलं! अजित पवारांचे 25 शिलेदार फायनल; कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार? जाणून घ्या

Ajit Pawar

मुंबई: Ajit Pawar NCP | लोकसभेनंतर आता काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्याचा समावेश आहे. या दोन्ही राज्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

महाराष्ट्रातील विधानसभेत २८८ जागा असून हरियाणामध्ये ९० जागा आहेत. या दोन्ही राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक पाऊल पुढे दिसत आहे. राष्ट्रवादीचे २५ उमेदवार ठरले आहेत. तसेच अजित पवार बारामतीतून लढणार असल्याची माहिती आहे. महायुतीत जागावाटपाची चर्चा आहे मात्र त्याआधीच राष्ट्रवादीने आपले २५ उमेदवार ठरवले आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे.

बारामती – अजित पवार
उदगीर – संजय बनसोडे
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
दिंडोरी – नरहरी झिरवळ
येवला- छगन भुजबळ
पुसद – इंद्रनील नाइक
वाई खंडाळा महाबळेश्वर – मकरंद आबा पाटील
पिपरी – अण्णा बनसोडे
परळी – धंनजय मुंडे
इंदापूर – दत्ता भरणे
रायगड – अदिती तटकरे
कळवण – नितीन पवार
मावळ –सुनील शेळके
अमळनेर – अनिल पाटील
अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
कागल – हसन मुश्रीफ
खेड – दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर – संग्राम जगताप
जुन्नर – अतुल बेनके
वडगाव शेरी – सुनील टिंगरे

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला टोला

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed