Maharashtra Assembly Election 2024 | शिंदे गटाकडूनही 25 उमेदवारांची नावे फायनल; पक्षातील बड्या नेत्याने दिली माहिती

Eknath Shinde

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीबाबत हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने (Ajit Pawar NCP) आपले २५ उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटानेही (Shivsena Shinde Group) आपली २५ नावे फायनल झाल्याचे कळवले आहे.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, आमच्या देखील २५ उमेदवारांची यादी जवळपास फायनल होण्यामध्ये आली आहे. ती यादी सुद्धा आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच जाहीर करतील, असे त्यांनी म्हंटले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, ” एक-दोन दिवसांमध्ये आमची सुद्धा यादी जाहीर होईल, असा अंदाज आहे. लोकसभेच्या पद्धतीने जागांचा तिढा महायुतीत राहिला, तसा विधानसभेत होणार नाही. ती काळजी महायुतीतील तिन्ही नेते घेत आहेत. यात वाद होऊ नये आणि जो विलंब लागतो, तसं होऊ नये.

जो उमेदवार निवडून येईल त्यालाच उमेदवारी देण्यात येईल, असे निश्चित असेल. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची शक्ती आहे,
त्या जागा लवकर जाहीर करून, कामाला लावावं. चौकटीत राहून उमेदवार पुढची कामे करत असतो.”
असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “बारामती (Baramati Assembly) हा अजित पवार यांचे होमग्राउंड आहे.
गेल्यावेळी त्यांचं मताधिक्य आहे. जवळपास सव्वा लाख मतांचा होतं. लोकसभेत वेगवेगळे खोटे नरेटिव्ह पसरवण्यात आले.
पण लोकसभा आणि इतर विधानसभा नगरपालिका या निवडणुका या वेगवेगळ्या असतात.
अजित पवार बारामतीतून लढतील, असे विधान पाटील यांनी केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed