Devendra Fadnavis On Eknath Khadse | राज्यपाल पदाच्या खडसेंच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले – ” खडसेंच्या बाबतीत केंद्रीय नेतृत्वाने…”

मुंबई: Devendra Fadnavis On Eknath Khadse | “देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती. त्यावेळी त्यांनी मुलीची शपथ घेतली होती”, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis On Eknath Khadse)
ते म्हणाले,” एकनाथ खडसेंचे विधान मी ऐकलेले नाही. पण खडसेंच्या बाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून, त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल”, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
“एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावलं, मी त्यांच्याकडे गेलो. फडणवीस मला म्हणाले, मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे. तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे. त्यावर मी त्यांना स्पष्ट म्हणालो, देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासनं देता, हे करेन, ते करेन, परंतु तुम्ही ती आश्वासनं पूर्ण करत नाही. त्यामुळे मला खरं सांगा, कारण माझा विश्वास बसत नाही.
त्यावर ते मला म्हणाले, आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. मी त्यांना म्हटलं,
आनंदाची गोष्ट आहे, मला राज्यपाल केलं तर चांगलंच आहे. परंतु माझा या आश्वासनांवर विश्वास नाही.
त्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो,
आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. हे देवेंद्र फडणवीस
यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे”, असा गौप्यस्फोट खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा