Mahayuti Govt On Maratha Reservation | विधानसभेआधी मराठा आरक्षणावरून महायुती सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; हैदराबाद गॅझेटियर लागू होणार?

Eknath Shinde-Manoj Jarange Patil

मुंबई: Mahayuti Govt On Maratha Reservation | राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला. मराठवाड्यातील ८ पैकी केवळ एका जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झाला. (Mahayuti Govt On Maratha Reservation)

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election 2024) आरक्षण प्रश्नाचा फटका बसू नये, यासाठी आता सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या असून राज्य सरकार लवकरच हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मराठा समाज (Maratha Samaj) हा मूळ कुणबी असल्याने आम्हाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मनोज जरांगे यांची मूळ मागणी आहे. या मागणीला आधार म्हणून जरांगे पाटील हे सातत्याने हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख करत असतात. हैदराबाद गॅझेटियरमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा जरांगे यांच्याकडून केला जातो.

या पार्श्वभूमीवर सदर गॅझेटियरच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. राज्य सरकारकडून आता ही मागणी मान्य करत विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी माहिती आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून
त्यांच्या वतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.
पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे
यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर
बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | शिंदे गटाकडूनही 25 उमेदवारांची नावे फायनल; पक्षातील बड्या नेत्याने दिली माहिती

Devendra Fadnavis On Eknath Khadse | राज्यपाल पदाच्या खडसेंच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले – ” खडसेंच्या बाबतीत केंद्रीय नेतृत्वाने…”

You may have missed