Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

मुंबई: Mahayuti News | महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सातत्याने अजित पवार (Ajit Pawar) यांना महायुतीतील मित्रपक्षांचे नेते लक्ष्य करीत आहेत. जाहीर सभेत अजित पवारांवर टीका होत आहे. एकीकडे हे चित्र असतानाच स्थानिक पातळीवरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीत सहभागी झाल्याचे, तसेच भाजपने राष्ट्रवादीला सामावून घेतल्याचे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना पटलेले दिसत नाही. (Mahayuti News)
याबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केले आहे. “महायुतीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चांगले सुसंवाद आहेत. समन्वय ही आहे. पण जिल्हा आणि तालुका पातळीवर सुसंवाद नाही”, याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजप बरोबर पहिल्यांदाच युती केली आहे. पण कार्यकर्त्यांची मने काही जुळलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद होताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने सतत शिवसेना (Shivsena Shinde Group) आणि भाजप (BJP) बरोबर संघर्ष केला आहे. त्यात स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आघाडीवर होते. यावेळी आम्ही युतीत आहोत. असं असलं तरी तालुका आणि जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांची मनं काही जुळलेली नाहीत हे सत्य आहे.
ज्यांच्या बरोबर संघर्ष केला त्यांच्या बरोबर जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत.
त्यातूनच काही जण काही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.
पण आपण त्याकडे लक्ष देत नाही असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र नेत्यांच्या आणि पक्षाच्या पातळीवर महायुतीत चांगला समन्वय असल्याचेही ते म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा