EVM Promotion Chariot-Ajit Pawar | ईव्हीएम प्रचार रथाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन; नियमांचा भंग प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे मागवला खुलासा

Ajit Pawar-EC

पुणे: EVM Promotion Chariot-Ajit Pawar | आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात (Khed Alandi Assembly) ईव्हीएम प्रात्यक्षिक आणि जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या (Khed Tahasil Office) आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. (EVM Promotion Chariot-Ajit Pawar)

निवडणूक आयोगाच्या कक्षेतील हा कार्यक्रम इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित न करता मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने तालुका निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहिता भंगाचा पश्न निर्माण झाला आहे.

खेड- आळंदी विधानसभा मतदार संघात ⁠इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन अर्थात, ईव्हीएम विषयी जनजागृती करण्यासाठी हा प्रचार रथ तयार करण्यात आला होता. या रथाचे उद्घाटन तहसीलदार ज्योती देवरे (Jyoti Deore) यांनी अजित पवार यांच्या हस्ते केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी तहलसीदार ज्योती देवरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवडणूक आयोगाचे कार्यक्रम कसे घ्यावेत, याचे नियम निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार, निवडणूक आयोगाचे कार्यक्रम मंत्री, लोकप्रतिनिधी किंवा ठराविक राजकीय पक्षाच्या प्रमुख किंवा प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेऊ नयेत असा नियम आहे.

मात्र, निवडणूक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खेडचे
प्रांताधिकारी अनिल दौंडे (Anil Daunde) आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या हस्ते मतदान यंत्र हाताळणी व प्रशिक्षण कार्यक्रम जनजागृती रथाचे उदघाटन केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली