Murlidhar Mohol At Bhau Rangari Ganpati | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन; माध्यमांशी बोलताना म्हणाले – ‘पुनीत बालन हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे आधारस्तंभ’ (Videos)

पुणे: Murlidhar Mohol At Bhau Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्टच्या बाप्पाच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती दर्शवित आहेत. दरम्यान, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी दरवर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनाला, आरतीला येत असतो. माझे अत्यंत जवळचे स्नेही मित्र पुनीतदादा बालन हे अत्यंत चांगल्या मांगल्य, पवित्र वातावरणात उत्सव साजरे करतात. म्हणून दरवर्षी न चुकता बाप्पाच्या दर्शनाला मी इथे येत असतो.
पुनीत बालन यांच्या माध्यमातून पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वेगळ्या प्रकारची दिशा आणि एक पाठबळ मिळतेय. प्रत्येक गणेशमंडळाचा कार्यकर्ता खुश आहे, समाधान व्यक्त करतोय. सर्व गरजवंतांना मदत करण्याचं काम ते करीत आहेत. सैनिक, खेळाडू सर्वांसाठी त्यांचं काम आहे. सर्वांसाठीच ते काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे.
पुनीत बालन हे पुण्याच्या गणेशोत्सवाला आधारस्तंभ म्हणून आधार देण्याचं ते काम करतात. पुण्याचा गणेशोत्सव ही आमची एक वेगळी परंपरा आहे. १३० वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा असलेला हा उत्सव आहे. त्यामुळे हा उत्सव सुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने अत्यंत धार्मिक, मंगलमय वातावरणात पार पडतोय. त्यामुळे बाप्पा तुझे आशीर्वाद पुणेकरांना, देशवासियांना राहूदेत.
तुझं नाव विघ्नहर्ता आहे. त्यामुळे या समाजावरती, या देशावरती कुठलेही विघ्न येऊ देऊ नको. देशातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, कामगार अत्यंत शेवटच्या माणसाला सुद्धा तुझा आशीर्वाद मिळो. तुझ्या आशीर्वादाने हा देश मोदीजींचा जो 2047 चा विकसित भारताचा संकल्प आहे तो निर्विघ्नपणे पार पडो. तुझा आशीर्वाद सर्वसामान्य माणसापासून देशाचे प्रधानमंत्री इतके काम करतात त्यांनाही मिळो.
ते पुढे म्हणाले, मागच्या दहा वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला, पुण्याला अनेक योजना दिल्या. हजारो कोटी रुपयांचे प्रोजेक्ट या पुण्यामध्ये आले. 16 तारखेला पुण्याची पहिली वंदे भारत (Vande Bharat Express) पुणे ते हुबळी सुरु होतेय. वंदे भारतची पहिली सेवा पुणेकरांना मिळणार आहे. राज्यातल्या तीन वंदे भारतच्या योजना सुरु होत आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 15 हजार 900 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज 81 हजार कोटींची कामे महाराष्ट्रात सुरु आहेत. हे मोदीजींचे महाराष्ट्रावरचे, पुण्यावरचे प्रेम आहे. शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो (Shivaji Nagar Court To Swargate Metro Route) मार्ग सुरु होतोय. तसेच स्वारगेट ते कात्रज हा या नवीन भुयारी मेट्रो मार्गाचे (Swargate To Katraj Metro) भूमिपूजन होत आहे. खऱ्या अर्थाने मोदीजींकडून गणेशोत्सव निमित्ताने पुणेकरांना ही भेट आहे.