Supriya-Sachin Pilgaonkar At Bhau Rangari Ganpati | सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन; सचिन म्हणाले – ‘मी भाऊसाहेब रंगारी यांना मानवंदना देतो’ (Videos)

पुणे : Supriya-Sachin Pilgaonkar At Bhau Rangari Ganpati | अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले असता त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) बाप्पाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याकडून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. (Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_8VkhXpTsb
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आज मला इथं येण्याचं भाग्य मिळालं. काहीतरी अद्वितीय आणि अद्भुत बघितल्याचं मला समाधान मिळालं, याचं आंतरिक समाधान वाटतंय. गणपतीची मूर्ती बघून हृदयात हललं. इतकं या गणपतीच्या मूर्तीत तेज आहे. यामागे भाऊसाहेब रंगारी यांची तपश्चर्या होती. त्यांच्याबद्दल यात जे लिहलेय ते वाचायला मला खूप आवडणार आहे. या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. हे वाचायला मी खूप उत्सुक आहे. मला खूप वाईटही वाटतेय की मला याबद्दल अगोदर माहिती नव्हती.
https://www.instagram.com/p/C_9v6L7pr5l
आता मात्र एकही मनुष्य असला नाही पाहिजे आपल्या हिंदुस्तानात ज्याला हा बाप्पा माहित नसेल. हा पहिला सार्वजनिक गणपती आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. अगदी भक्तिभावाने मी गणपती बाप्पाला वंदन करतो आणि भाऊसाहेब रंगारी यांना मानवंदना देतो. मला आनंद आहे की लोकांपर्यंत हे पुनीत बालन (Punit Balan) पोहोचवत आहेत. त्यांना धन्यवाद देतो.
https://www.instagram.com/p/C_5jiXUJHYn
बाप्पांचे आशीर्वाद पुनीत बालन आणि जे सर्व नतमस्तक होत आहेत त्या सर्वांना मिळो. आज आम्ही खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहोत. मात्र, आम्ही इथं आल्यावर ते विसरून गेलो. आता त्याच्याहून जास्त कोणाला काय माहित असणार आहे. मागायचं काय त्याच्याकडून…
https://www.instagram.com/p/C_7aHC4prW6
देणं हे त्याचं काम आहे. त्यामुळे आम्ही फक्त त्याच्याकडे बघू शकतो, वंदन करू शकतो. नतमस्तक होऊ शकतो. आणि त्याची आराधना करू शकतो.
https://www.instagram.com/p/C_2XL22pG8D
गणपती बाप्पाकडे काही मागितलं नाही कारण त्याच्याकडे पाहिलं की वाटलं जा, तुला सर्व मिळेल मग काय मागायचं बाप्पाकडे. मागणं करावं असं काही वाटलंच नाही. इतकं काही या देवानं दिलं आहे. मी पहिल्यांदा इथं आलोय पण आक्टोबर नंतर मी पुन्हा याठिकाणी येणार आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसेल.
https://www.instagram.com/p/C_0ni1bJ6f1
नवरा माझा नवसाचा २ (Navra Maza Navsacha 2) चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले,
या चित्रपटात तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. भरपूर मेजवानी असणार आहे. भरपूर मनोरंजन असणार आहे.
फक्त चित्रपटगृहात तुम्हाला उकडीचे मोदक मिळणार नाहीत.
पहिल्या सिन मध्ये मी त्यामध्ये उकडीचा मोदक फोडतोय आणि सुप्रिया त्याच्यावर साजूक तूप घालतेय.
असा पहिला शॉट आहे त्या सिन चा… विसर्जनानंतरची पोकळी दोन दिवसात भरून निघुदेत,
असेही त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसंदर्भात बोलताना सांगितलं. (Supriya-Sachin Pilgaonkar At Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_0mV3tpb7E
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली