Sahakar Nagar Pune Crime News | 16-17 वर्षाच्या मुलांनी प्रवाशाच्या पोटाला चाकू लावून लुबाडले; चार अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे पुन्हा एकदा निर्दशनास आले आहे. परगावाहून पहाटे आलेल्या प्रवाशाच्या पोटाला चाकू लावून त्याला लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चार १६-१७ वर्षाच्या अल्पवयीन मुलांना पकडले. (Robbery Case)
याबाबत २१ वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बिबवेवाडी (Bibvewadi) येथील व्हि आय टी कॉलेजमध्ये (VIT College) इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. ते ९ सप्टेबर रोजी रात्री जयसिंगपूर ते स्वारगेट (Swargate) या बसने निघाले. १० सप्टेबर रोजी पहाटे साडेतीन वाजता ते पुणे -सातारा रोडवरील (Pune Satara Road) डी मार्टचे चौकात बसमधून उतरले. त्यांनी आपल्या मित्राला घेण्यासाठी बोलावले. त्याची वाट पहात ते थांबले होते. त्यावेळी एका दुचाकीवरुन चौघे मुले आली. त्यांनी फिर्यादीची गचंडी पकडून कोठे चाललास, असे म्हणून बॅगेत काय आहे, याची चौकशी करु लागले. (Minors Detain In Robbery Case)
त्यांनी कोल्हापूर येथून आलो आहे, रुमवर चाललो आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण फिर्यादीची बॅग ओढू लागला. त्यांनी प्रतिकार करताच त्याने चाकू पोटाला लावून हातातील मोबाईल व बॅग जबरदस्तीने हिसकावले. त्यांच्या खिशातील ३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याचवेळी त्यांचा मित्र दुचाकीवरुन आल्याने त्याला पाहून ते बॅग तेथेच टाकून मोबाईल व ३ हजार रुपये घेऊन पळून गेले. या प्रकारामुळे भितीमुळे फिर्यादी हे परत आपल्या मुळ गावी निघून गेले होते. दरम्यान, पोलिसांनी या चौघा अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडील मोबाईल हा चोरीचा असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादीने पुण्यात येऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. (Sahakar Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली