Ajit Pawar On Eknath Shinde | “मला गुलाबी होण्याची गरज नाही”, मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले,…

Eknath Shinde-Ajit Pawar

मुंबई : Ajit Pawar On Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. एकूणच राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना होणार असताना आता महायुतीतच मित्रपक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जनसन्मान यात्रेच्या (Jan Sanman Yatra) माध्यमातून स्वतः अजित पवार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या या जन सन्मान यात्रेमधील ‘गुलाबी रंगांची राज्यभरात चर्चा सुरू आहे. पण याच गुलांबी रंगावरून एका ठिकाणी बोलताना “मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा , तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो, कुणातही मिसळू शकतो”, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना डिवचले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला अजित पवार यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “पांढरा रंग सगळ्यात चांगला आणि शुभ्र आहे, मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं योग्य आहे. मीपण आज पांढरा शुभ्र शर्ट घातलाय”, अशी कोपरखळी मारत ते पुढे म्हणाले, “गणेशोत्सव आहे कशाला उगाच हे हा बोलला तो ते बोलला विचारता”, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. अजित पवार यांनी लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते. (Ajit Pawar NCP News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed