Ajit Pawar News | ‘मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही’; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘महायुतीचे सरकार आणणे हेच आमचे टार्गेट’

Ajit Pawar

पुणे : Ajit Pawar News | “सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असते. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आहे. परंतू सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी पुण्यात म्हणाले.

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Ganpati) पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सगळ्याच पक्षांच्या प्रमुखांना मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असते. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आहे. पण, मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. त्यामुळे सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही.

महायुतीचे सरकार आणणे हेच आमचे टार्गेट

पवार म्हणाले की, महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) आणणे हे आमचे टार्गेट आहे. त्यासाठी महायुतीतील सगळेच घटक प्रयत्नशील आहेत. त्या पध्दतीने आम्ही पुढे चाललो आहोत. जागा वाटपाचे बरेच काम झाले आहे. काही थोडे फार आहे. मार्ग नाही निघाला, तर पुन्हा बसू आणि मार्ग काढू. ज्यावेळी मित्र पक्षांसहित सगळ्यांचे जागा वाटप होईल तेव्हा सविस्तर जाहीर करण्यात येईल. असे ही पवार म्हणाले.

70 टक्के जागांवर एकमत झाले

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी जागावाटपासाठी 80-90 जागांचा आग्रह धरलेला नाही. आम्ही लढण्यासाठी फॉर्म्युला निश्चित केला आहे. आत्तापर्यंत 70 टक्के जागांवर एकमत झाले आहे. (Ajit Pawar News)

गणपती उत्सव Video –

https://www.instagram.com/p/C_5jiXUJHYn

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed